Pune: भुकेचा प्रश्न सोडवणे हे आव्हान - विश्व सायकल यात्री सोनवणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विश्व सायकल यात्री सोनवणे

भुकेचा प्रश्न सोडवणे हे आव्हान - विश्व सायकल यात्री सोनवणे

कोथरुड : जगभरात सायकल भ्रमण करताना लक्षात आले की, मला जशी तीन वेळा जेवणाची आवश्यकता आहे तीच जगातील सर्वांना आहे. सर्वांना पोटभर अन्न मिळेल अशी व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी महिलांचा सत्ताकारणात सहभाग वाढवण्याची गरज आहे. असे मत विश्व सायकल यात्री नितीन सोनवणे याने व्यक्त केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विश्वशांती व मैत्री सायकल यात्रेचे कोथरुडमधील गांधीभवन येथे आगमन झाले. या यात्रेअंतर्गत महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाचा कार्यकर्ता नितीन सोनवणे याने १८ नोव्हेंबर २०१६ यात्रेला सुरुवात केली. राशिन येथे या यात्रेचा समारोप तीन दिवसांनी होईल. १८२८ दिवसाच्या कालावधीत सोनवणे यांनी ४६ देशांचे सायकलवरुन भ्रमण केले. त्यानिमित्ताने गांधीभवन मध्ये आयोजित स्वागत समारंभात अनुभव कथन करताना सोनवणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष कुमार सप्तर्षी, अन्वर राजन, अप्पा अनारसे, संदीप बर्वे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

हेही वाचा: पुणे : ७१६८ पदांचे मागणीपत्र लोकसेवा आयोगास प्राप्त

आपले अनुभव सांगताना सोनवणे म्हणाले की, सत्याच्या जवळ घेवून येणारी ही यात्रा होती. जगभरातील भ्रमणात मला असे दिसले की सर्व भागातील महिला या खुप कष्ट करणा-या आहेत. महिलांना राजकारण, सत्ताकारणात सहभाग दिला पाहिजे. देशाचे पंतप्रधानपद महिलेला मिळावे. कारण त्यांच्यामध्ये मानवता आहे. स्रीपुरुष समानतेचा विचार करता थायलंड, कंबोडीया या देशात स्रीयांना समाजात चांगले स्थान आहे. आफ्रिकेत महिलांना समान स्थान आहे असे वाटले.

सोनवणे पुढे म्हणाले की, लोकांशी संवाद साधणे सोपे जावे यासाठी यात्रे संदर्भात पत्रके तयार केली होती. प्रत्यक्ष संवादासाठी गुगल ट्रान्सलेटर वापरत होतो. पण शब्दांपेक्षा प्रेमाची भाषा, देहभोली ही जास्त परिणामकारक वाटली. या प्रवासात शाकाहाराचे पालन खुप कठिण होते. आफ्रिकेमध्ये मी कच्च्या भाज्या खायला सुरुवात केली. यात्रे बद्दलच्या अनुभवावर श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना सोनवणे म्हणाले की, यात्रेत बरे वाईट अनुभव पण आले.

भुकेचा प्रश्न सोडवण्यासाठी समुद्र शेती हा मला योग्य पर्याय वाटतो. त्यावर मी आता काम करणार आहे.

loading image
go to top