esakal | पुणे: ‘पीएमआरडीए’कडे मांडणार बाजू
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे: ‘पीएमआरडीए’कडे मांडणार बाजू

पुणे: ‘पीएमआरडीए’कडे मांडणार बाजू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पौड : ‘‘ग्रामीण भागात ‘पीएमआरडीए’ने शेतकऱ्यांच्या जागेवर टाकलेल्या आरक्षणामुळे शेतकऱ्यांच्या पुढील पिढ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. याबाबत कायदेशीर मार्गाने शेतकऱ्यांची बाजू मांडणार आहे,’’ अशी ग्वाही अॅड. सुधाकर आव्हाड यांनी दिली.

हेही वाचा: भारतात पर्सनल एआय असिस्टंट एसयूव्ही "ऍस्टर'

‘पीएमआरडीए’च्या आरक्षणाबाबत पंचायत समितीच्या सभागृहात पौड (ता. मुळशी) येथे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करताना अॅड. आव्हाड बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी गटनेते शांताराम इंगवले, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, माजी सभापती रवींद्र कंधारे, माउली कांबळे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी अॅड. आव्हाड यांनी प्रारूप आराखड्यावर कशा पद्धतीने हरकती व सूचना करायच्या याबाबत मार्गदर्शन केले.

शेतकऱ्यांच्या जागेवर टाकलेल्या विविध झोनबाबत माहिती देऊन भविष्यातील त्याच्या फायद्यातोट्याबाबत जागृती केली. या आरक्षणांबाबत शेतकऱ्यांनी सावध राहण्याच्या सूचना केल्या. यावेळी शेतकऱ्यांनीही शंका विचारल्या. अॅड. आव्हाड यांनी त्यास उत्तरे दिला. प्रास्ताविकात रवींद्र कंधारे यांनी ‘पीएमआरडीए’ने टाकलेल्या आरक्षणांमुळे शेतकऱ्यांची कशाप्रकारे फसवणूक होत आहे, याबाबत माहिती दिली.

रामचंद्र ठोंबरे, आत्माराम कलाटे, तुकाराम टेमघरे, अंजली कांबळे, कोमल वशिवले, चंदा केदारी, संग्राम मोहोळ, संजय उभे, धैर्यशील ढमाले, बबनराव साखरे, बाळासाहेब सणस, सागर साखरे, नंदुशेठ भोईर, हनुमंत सुर्वे, बाबाजी शेळके, तात्या देवकर, आनंदा घोगरे, बंडू आमले, भाऊ आखाडे, शरद शेंडे, यशवंत गायकवाड, माउली साठे, मनोज साठे आदी उपस्थित होते.

loading image
go to top