

Commerce Subject Proposed for School Curriculum
Sakal
पुणे : ‘‘वाणिज्य विद्याशाखेत करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. इयत्ता पाचवी ते दहावीच्या अभ्यासक्रमात वाणिज्य विषयाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, शिक्षण सचिव आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांची भेट घेतली आहे.