esakal | अवैध प्रवासी वाहतूक जोरात
sakal

बोलून बातमी शोधा

chakan

Pune : अवैध प्रवासी वाहतूक जोरात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चाकण : परिसरातील रस्त्यांवर सध्या अवैध प्रवासी वाहतूक जोरात सुरू आहे. जीप व रिक्षांतून धोकादायकरीत्या प्रवाशांना बसविले जात असल्याने अपघात होत आहेत. वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

चाकण-आंबेठाण, चाकण-तळेगाव, चाकण-शिक्रापूर, भोसरी-चाकण या रस्त्यांवर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा व जीप आहेत. ही वाहने रस्त्यांवर अस्ताव्यस्त उभी केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना या वाहनांमध्ये बसविले जात असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. याकडे प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.

काहीजण तर अगदी वाहनांच्या बाहेर उभे राहून प्रवास करत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. प्रवाशांचे जीव धोक्यात घालणाऱ्या या वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

loading image
go to top