weather update: बळीराजा पुन्हा संकटात! 'या' जिल्ह्यांमध्ये ढगांच्या कडकडाटांसह गारपीटीची शक्यता

weather update
weather updateesakal

Weather Update: सध्या राज्यात उष्णतेची लाट सुरू असताना काही जिल्ह्यांना पुन्हा अवकाळीचा फटका बसणार आहे. हवामान विभागाने नव्याने जारी केलेल्या अधिसूचनेत अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार पुढील दोन ते तीन दिवस राज्यात काही ठिकाणी तुरळक, हलका पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या गडगडाटसह वादळी पावसाची शक्यता आहे.

weather update
Nigeria shooting: जमिनीच्या वादातून पडला रक्ताचा सडा! भर बाजारात अंधाधुंद गोळीबार; 50 जण जागीच ठार

हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यांनी दिलेल्या माहिती नुसार पुणे शहरात व जिल्ह्यांत 7, 8, 9 तारखेला विजांच्या कडकडासह शहरात हलक्या पावसाची शक्यता आहे.

यात प्रामुख्याने 7 तारखेला सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात विजांच्या गडगडाटसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर राज्यातील उर्वरीत जिल्ह्यात उन्हाचा कडाका पाहायला मिळणार आहे.

राज्यात गेल्या 24 तासांत 803 नव्या रूग्णांची नोंद, तीन जणांचा मृत्यू

महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा कहर पाहिला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये भर पडत आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ८०३ नवे करोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात ३ हजार ९८७ सक्रिय रूग्ण आहेत. तर एकूण तिन जणाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता चिंतेत वाढ झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com