esakal | पुणे: पाचव्या दिवशी ५८ हजार मूर्तींचे विसर्जन
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे: पाचव्या दिवशी ५८ हजार मूर्तींचे विसर्जन

पुणे: पाचव्या दिवशी ५८ हजार मूर्तींचे विसर्जन

sakal_logo
By
ब्रीजमोहन पाटील

पुणे: पाच दिवसाच्या गणपती बाप्पाला पुणेकरांनी मंगळवारी निरोप दिला आहे. महापालिकेच्या संकलन केंद्रावर व फिरत्या हौदामध्ये ५८ हजार ५९६ मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत सर्वाधिक १६ हजार १५१ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांपैकी सहा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नगरसेवकांनी ३३ फिरते हौद पुरविल्याचे नागरिकांना दिलासा मिळाला.

हेही वाचा: पुणे : वाहनतळ चालकास महापालिकेने लावला दोन लाखाचा दंड

कोरोनामुळे महापालिकेने विसर्जन घाट आणि तेथील हौदांवर गर्दी होऊ नये यासाठी तेथे विसर्जनास बंदी घातली आहे. त्याऐवजी शहरात फिरते विसर्जन हौद व मूर्ती संकलन केंद्र तयार करण्यात आले आहेत. शहरात घनकचरा विभागाचे ५५ व क्षेत्रीय कार्यालयांचे ६४ फिरते हौद होते. तर ३३ नगरसेवकांनी स्वतःचे फिरते हौद उपलब्ध करून दिले असल्याने नागरिकांची सोय झाली.

तसेच शहरात २५५ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र निश्‍चीत केले आहेत.

नागरिकांनी घरच्या घरी गणपतीचे पर्यावरण पुरक विसर्जन करावे यासाठी अमोनिअम बायकार्बोनेट वाटप केले आहेत, यासाठी २७७ ठिकाणी केंद्र आहेत. आत्तापर्यंत ४८ हजार ५४४ किलो अमोनिअम बायकार्बोनेट वाटप करण्यात आले आहे. घरामध्ये किती मूर्तींचे विसर्जन झाले हे स्पष्ट होऊ शकले नाही तरी गेल्यावर्षीपेक्षा यंदा जास्त प्रतिसाद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करताना नागरिकांना विसर्जन हौद कुठल्या भागात कधी येणार याचे वेळापत्रक तयार करून सोशल मिडियावरून व्हायरल केले. त्यामुळे विसर्जनातील गोंधळ टळला. तसेच नगरसेवकांचे ३३ फिरते हौद होते. यामध्ये येरवडा- कळस क्षेत्रीय कार्यालयात १ हौद होता. शिवाजीनगर ४, सिंहगड रस्ता ४, वानवडी-रामटेकडी १२ आणि भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात ९ हौद होते. त्यामुळे नागरिकांची सोय झाली.

उर्वरित ९ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील एकाही नगरसेवकाने फिरता हौद दिलेला नाही. दरम्यान, गेल्या पाच दिवसात शहरात एकूण ६४ हजार ५९७ मूर्तीचे विसर्जन झाले. तर ७० हजार १६३ किलो निर्माल्य गोळा झाले आहे. या निर्माल्याचे खत तयार करून महापालिकेचे उद्यान व शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहे.

loading image
go to top