पुणे - हस्तांतरणाच्या प्रक्रियेमध्ये अडकलेली ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ अखेर रुळावर आली असून, महिला व बालकल्याण विभागाकडून या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गतीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत..सध्या अंगणवाडी केंद्रांमार्फत प्राथमिक नोंदणी (मॅपिंग) आणि नवीन लाभार्थ्यांच्या नोंदणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ६४६ गर्भवतींची नोंदणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, २०१७ पासून योजनेचा लाभ न मिळालेल्या महिलांशीही आता संपर्क साधण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे..‘मातृवंदना’ लाभार्थी गर्भवतींना पाच हजार आणि सहा हजार रुपये दोन टप्प्यांत दिले जातात. योजना आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत असून, ही योजना महिला बालकल्याण विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत केंद्राने यापूर्वीच सूचना केल्या होत्या. योजनेच्या अंमलबजावणीला १ जुलै २०२५ पासून सुरुवात झाली..त्यामध्ये पहिल्यांदा योजनेचे अर्ज करण्यासाठी प्रत्येक अंगणवाडी केंद्राची योजनेच्या पोर्टलवर नोंदविण्याचे काम सुरू आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे म्हणाले की, काही तांत्रिक अडचणी आहेत. त्या सोडविण्यात येत आहेत. जिल्ह्यात सर्व सीडीपीओंना सूचना केल्या आहेत. त्यानुसार योजनेसाठी अर्ज नोंदणीचे काम सुरू आहे..प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणीत यापूर्वी पोर्टल बंद पडणे, तांत्रिक अडचणी आणि जबाबदारीच्या बदलामुळे मागील काही वर्ष महिलांना वेळेत लाभ मिळू शकला नव्हता. आता मात्र ही योजना महिला व बालकल्याण विभागाकडे सोपविण्यात आली असून, यशस्वी अंमलबजावणीची जबाबदारी त्यांच्यावर आहे..किती लाभ मिळतो?पहिल्या अपत्यासाठी शंभर दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यावर आणि सहा महिन्यानंतर किमान एक तपासणी केल्यानंतर पहिल्या टप्प्यातील तीन हजार रुपयांची रक्कम महिलेच्या खात्यावर वर्ग करण्यात येते. तर प्रसूतीनंतर बालकाचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर दोन हजार रुपये देण्यात येतात. याशिवाय दुसरे अपत्य जर मुलगी असेल, तर तिच्या लसीकरणानंतर सहा हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येतात..योजना का राबविली जाते?माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा माता यांना सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करणेत्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी, तसेच जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावेमातामृत्यू, बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रणात राहावा, या उद्देशाने ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ राबविली जाते. .दृष्टिक्षेपात...६,०९४ - पुण्यात अंगणवाडी केंद्रे८४ - तांत्रिक अडचणी येणारे केंद्रे२०१७ पासून - योजनेचा लाभ न मिळालेल्या महिलांशी संपर्क१ जुलै २०२५ - योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात.आम्ही सध्या योजनेवर काम करत आहोत. प्राथमिक नोंदणी प्रक्रिया करणे सर्वात मोठे काम होते. नोंदणीसाठी आठ महिन्यांचा कालावधी लागणार होता, ते काम दोन महिन्यांत पूर्ण केले. काही तांत्रिक अडचणी आहेत, त्याबाबतही काम सुरू आहे. पुण्यातील सर्व अधिकाऱ्यांची याबाबत कार्यशाळादेखील झाली आहे. जुन्या शिल्लक असलेल्या लाभार्थ्यांची कागदपत्रे मागवून त्यांनाही परवानगी देत आहोत.- मनिषा बिरारीस, बालविकास प्रकल्प अधिकारी तथा नोडल अधिकारी, पुणे शहर.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.