

Pune Under Prohibitory Orders for 14 Days; Know What Activities Are Banned
ESakal
आगामी सण सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांनी १८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा आदेश महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ च्या कलम ३७ (१), (२) आणि (३) अंतर्गत जारी करण्यात आला आहे. पोलीस उपआयुक्त (विशेष शाखा) डॉ. प्रशांत अमृतकर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, पुणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात १८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२:०१ पासून ते ३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हा प्रतिबंध लागू राहील.