Pune : बारामती बँकेच्या निवडणूकीत 15 जागांसाठी 105 उमेदवार रिंगणात उरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती सहकारी बँकेच्या निवडणूकीचे बिगुल वाजले

Pune : बारामती बँकेच्या निवडणूकीत 15 जागांसाठी 105 उमेदवार रिंगणात उरले

पुणे (बारामती) : येथील बारामती सहकारी बँकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणूकीमध्ये आज झालेल्या छाननीमध्ये 68 उमेदवारी अर्ज विविध कारणांसाठी अवैध ठरविण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद टांकसाळे यांनी दिली.

या निवडणूकीमध्ये 15 जागांसाठी 235 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर त्या पैकी 68 अर्ज अवैध ठरल्याने आता 15 जागांसाठी 105 उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज माघारी माघारी घेण्याची मुदत 8 डिसेंबर असून 19 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने या महिनाअखेरीपर्यंत त्यांच्या पॅनेलची घोषणा केली जाण्याची शक्यता राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या पॅनेलमध्ये संधी मिळविण्यासाठी अनेक इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु असून अजित पवार यांनी पॅनेलमध्ये संधी मिळावी या साठी अनेकांनी हस्ते परहस्ते त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचविण्याचे प्रयत्न सुरु केले आहे.

हेही वाचा: 'अब्बाजान, चच्चाजानच्या लोकांनी लक्षात ठेवावं...', योगींचा ओवैसींना इशारा

दरम्यान बारामतीतील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी नवीन व जुन्या संचालकांचा मेळ घालणार असल्याचे विधान केल्यानंतर विद्यमान संचालकांसह काही माजी संचालक व नवीन इच्छुकांनीही मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

loading image
go to top