पुण्यात अर्धवट कामाचं उद्घाटन होतंय' - शरद पवार

पुणे मेट्रोच्या कामाचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
Narendra Modi Sharad Pawar
Narendra Modi Sharad Pawar

पुणे मेट्रोचं उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्या होणार आहे. त्यासाठी शहरात मोठी तयारी सुरु आहे. पण या उद्घाटन कार्यक्रमावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा आणि राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी गंभीर इशारा दिला आहे. मेट्रोच्या अर्धवट कामाचं उद्घाटन होतंय, काही संकट निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल, असं शरद पवार यांनी PM मोदींना उद्देशून म्हटलं आहे. (Pune Inauguration of partial works If some crisis heppended Sharad Pawar warning to PM Narendra Modi)

Narendra Modi Sharad Pawar
मोठी बातमी! रशियाकडून तात्काळ युद्धबंदीची घोषणा

पवार म्हणाले, "माझी आज देशाच्या पंतप्रधानांना विनंती आहे की ते उद्या पुण्यात येत आहेत. त्यांच्या दौऱ्याबद्दल काही तक्रार नाही, पण या मेट्रोचं काम पूर्ण झालेलं नाही त्याच उद्घाटन होत आहे. नदी सुधार करण्याची गरज आहे. नदी सुधारण्याचं काम हाती घेतलं पाहिजे. पण या नदीवर अनेक या धरणं आहेत. त्यामुळं कधी ढगफुटी झाली तर या मोठ्या संकटाची झळ आजूबाजूच्या गावातील लोकांना बसणार आहे. अर्धवट कामाचं उदघाटन केलं जातंय त्याच स्वागत करू, पण अशा अर्धवट कामामुळं जर काही संकट निर्माण झाल तर आपल्यालाच ते पाहायला लागेल" नवीन नदी सुधार प्रकल्पाबाबत अधिकारी आणि नेत्यांशी बोलू यावर तोडगा काढू असंही त्यांनी म्हटलं आहे.

Narendra Modi Sharad Pawar
पुणे : अर्धवट कामाचं होतंय उद्घाटन, काही संकट...; पवारांचा मोदींना इशारा

बऱ्याच दिवसांनी या परिसरात आलो आहे. पुणं बदलतंय, शहराचा चेहरा बदलतोय, पूर्वी इकडे जुन्या पद्धतीच गाव होतं. नागरिककरण वाढलं त्यामुळं आता जुनी ओळख राहिली नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातून इथं लोक आले आहेत. पण एकूणच पुणे शहरातील कामांबाबत आता सामंजस्याची कमतरता भासत आहे, असंही शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com