Cyber Crime
esakal
पुणे : शहरात सायबर गुन्हेगारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. एकाच दिवशी विविध पोलिस ठाण्यात ११ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असून, या घटनांमध्ये दोन कोटी १६ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक झाली. फेडेक्स कुरिअर, मनी लाँड्रींग, शेअर ट्रेडिंग, प्रीपेड टास्क, फेक अॅप, बनावट लिंक अशा विविध माध्यमातून सायबर गुन्हेगारांनी नागरिकांचे बॅंक खाते रिकामे केले.