Pune : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी यंदा विक्रमी 157 अर्ज दाखल...

अर्ज माघारी नंतरच निवडणुकीचे चित्र होणार स्पष्ट
 इंदापूर कृषी उत्पन्न बाजार
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार sakal

इंदापूर : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचीसाठी सोमवार (ता.03) दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशीपर्यंत 157 अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जे.पी.गावडे यांनी दिली.

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 28 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 157 अर्ज दाखल झाले.यामध्ये इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया होत

आहे. यामध्ये सोसायटी मतदारसंघातून 11 सदस्य पैकी (7 सर्वसाधारण जागेसाठी 70, 2 महिला जागेसाठी 11, 1 इतर मागास प्रवर्ग जागेसाठी 8 व 1 भटक्या जाती जमाती प्रवर्ग जागेसाठी 16), ग्रामपंचायत मतदार संघातून 4 जागांपैकी ( 2 सर्वसाधारण जागेसाठी 32, एक अनुसूचित जाती जमाती जागेसाठी 5, एक आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक जागेसाठी 8 अर्ज) तर 2 व्यापारी मतदारसंघ जागेसाठी 5 तर 1 हमाल मापाडी मतदार संघ जागेसाठी 2 असे एकूण 157 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

दरम्यान निवडणुकीचे चित्र कसे असेल याविषयी कार्यकर्त्यांमध्ये तर्कवितर्क लावले जात असले तरी भाजप ने निवडणूक न लढविण्याचा घेतलेला निर्णय वगळता अद्याप कोणत्याही पक्षाने आपली भूमिका जाहीर केली नसल्याने निवडणुकीबाबत फक्त चर्चा होत आहेत.खरे चित्र अर्ज माघारी नंतरच स्पष्ट होणार आहे.

4 हजार 828 मतदार बजावणार मतदानाचा हक्क..

या बाजार समितीसाठी एकूण 4 हजार 828 मतदार मतदानासाठी पात्र ठरले असून यामध्ये सोसायटी मतदारसंघातून 3 हजार 118, ग्रामपंचायत मतदार संघातून 1 हजार 191, व्यापारी मतदारसंघातून 460 व हमाल मापाडी मतदारसंघातून 59 एवढे मतदार पात्र ठरले आहेत.

या मातब्बरांचे अर्ज दाखल..

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी माजी सभापती व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, आमदार यशवंत माने, आमदार दत्तात्रय भरणे यांचे बंधू व विद्यमान संचालक मधुकर भरणे, माजी सभापती दत्तात्रय फडतरे,

संग्रामसिंह निंबाळकर, रोहित मोहोळकर, विलास माने, तुषार जाधव, शिवाजी इजगुडे, सचिन देवकर, संदीप पाटील, शिवाजी वाबळे,नानासाहेब शेंडे, सुभाष दिवस,मोहन जाधव, यांच्यासह शेतकरी संघटनेचे निलेश देवकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख महारुद्र पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com