esakal | Indapur: नगरपरिषदेच्या आझादी का अमृतमहोत्सव
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूर : नगरपरिषद

इंदापूर : नगरपरिषदेच्या आझादी का अमृतमहोत्सव

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा

इंदापूर : इंदापुरात सार्वजनिक शौचालय जन भागीदारी अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा,मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी शिंदे वस्ती सार्वजनिक शौचालयास भेट देवून तेथील स्वच्छतेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी क्यू आर कोड द्वारे सर्वप्रथम प्रतिक्रिया नोंदवून स्वच्छ,सुंदर व हरित इंदापूरचा संदेश दिला. यावेळी नगरपरिषदेच्या वतीने सार्वजनिक शौचालयाची साफसफाई करणाऱ्या कुणाल चव्हाण, रोहन चव्हाण, तानसिंग सोलंकी, शैलेश सोलंकी व महावीर मिसाळ या स्वच्छतादुतांनाप्रशिक्षण देवून त्यांना गुलाबपुष्प देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांना क्यू आर कोड द्वारे प्रतिक्रिया कशा द्याव्यात याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर सर्व उपस्थित नागरिकांनी स्वच्छतेची व वसुंधरेची शपथ घेतली.

यावेळी नगराध्यक्षा सौ. शहा म्हणाल्या, नागरिकांनी सार्वजनिक शौचालयाचा वापर व्यवस्थित करून स्वच्छता राखणे गरजेचे आहे तसेच स्वच्छतेबाबतच्या प्रतिक्रिया क्यू आर कोड द्वारे देणे गरजेचे आहे.

हेही वाचा: सांगोला : रतनकाकी प्रथमच राजकीय व्यासपीठावर

यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, सभा अधिक्षक गजानन पुंडे, माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचे नोडल अधिकारी गोरक्षनाथ वायाळ व अविनाश बर्गे, आरोग्य निरीक्षक सुनील पोळ, लिलाचंद पोळ, पाणीपुरवठा सहायक पर्यवेक्षक सुरेश सोनवणे, वीज विभाग पर्यवेक्षक दीपक शिंदे, उद्यान प्रमुख अशोक चिंचकर तसेच नगरपरिषदेचे इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

loading image
go to top