Pune News : आयटी पार्कसह उद्योगांच्या समस्या सोडवा; विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांची सूचना
Pune Industrial Development : पुण्यातील औद्योगिक समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली.
पुणे : ‘‘उद्योगांना सर्व पायाभूत सोयी सुविधा पुरविणे तसेच त्यांच्या समस्या, प्रश्न सोडविणे ही प्रशासनाची जबाबदारी असून त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे,’’ अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शुक्रवारी दिल्या.