
पुण्याच्या बौद्धिक, शैक्षणिक आणि कलात्मक विश्वाचे वैभव वृद्धिंगत करणाऱ्या `पुणे इंटरनॅशनल सेंटर’च्या वास्तूचे उद्घाटन येत्या प्रजासत्ताकदिनी होत आहे. डॉ रघुनाथ माशेलकर व डॉ. विजय केळकर यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. शांतिदूत दलाई लामा यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते अनुपस्थित असतील. परंतु, त्यांच्याकडून आलेल्या संदेशाचे वाचन होईल.