PIFF
sakal
पुणे - पुणे फिल्म फाउंडेशन, राज्य सरकारचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या वतीने आयोजित २४ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, २०२६ (पिफ) यंदा १५ ते २२ जानेवारी या कालावधीत होणार आहे. महोत्सवाची यंदाची संकल्पना ‘महान दिग्दर्शक, अभिनेते-चित्रपट निर्माते गुरुदत्त यांची जन्मशताब्दी’ अशी असून, महोत्सवात विविध विभागांमध्ये सुमारे १४० चित्रपट दाखविले जाणार आहेत.