

मुंबई : फसव्या गुंतवणूक योजना तयार करून त्याद्वारे पुणे जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना सुमारे ८८ कोटींचा गंडा घालणाऱ्या विशाखा राठोडला केंद्रीय अन्वेषण विभागाने सोमवारी (ता. ३) रात्री संयुक्त अरब अमिरातीतून यशस्वीरीत्या भारतात परत आणले. पुण्यात आणल्यानंतर विशाखाला अटक करण्यात आली. तत्पूर्वी विशाखाचा पती आणि पुण्याच्या चतुःशृंगी पोलिस ठाण्यात नोंद गुन्ह्यातील प्रमुख आरोपी अर्जुन याचे गेल्याच महिन्यात प्रत्यार्पण करण्यात आले होते. सीबीआय प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, राठोड दाम्पत्याने ‘एपीएस वेल्थ व्हेंचर्स एलएलपी’ या कंपनीच्या माध्यमातून विविध गुंतवणूक योजना बाजारात आणल्या. या सर्व योजनांमध्ये अतार्किक परताव्याची हमी देत गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले. मात्र परतावा न मिळाल्याने गुंतवणूकदारांनी या कंपनीविरोधात तक्रार दिली. प्राथमिक तपासानुसार राठोड दाम्पत्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेकडो गुंतवणूकदारांना सुमारे ८८ कोटी रुपयांचा गंडा घातला. पोलिसांचा ससेमिरा मागे लागताच हे दाम्पत्य परदेशात फरार झाले. एप्रिल २०२४ मध्ये त्यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली. विशेष एमपीआयडी न्यायालयाने अटक वॉरंटही जारी केले. त्यानंतर जून २०२६ मध्ये दोघांविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली. या नोटीसआधारे यूएई प्रशासनाने अविनाश आणि विशाखा यांना ताब्यात घेत भारतात पाठवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.