
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पुण्यावर विशेष लक्ष आहे असं सांगताना फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मोठं विधान केलंय. फडणवीस हे पुण्याला आपलं मूल मानतात असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. पुण्यात एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पुण्यात अनेक प्रश्न आहेत, मला इथं आल्यावर जे वाटतं ते मी त्यांना सांगते असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलंय.