Pune-Issue
Pune-Issue

#PuneIssues फटाक्यांचा कचरा पालिकेच्या माथी

कात्रज - भारती विद्यापीठ परिसरातील महापालिका शाळेच्या क्रीडांगणावर पडलेला फटाका स्टॉलचा कचरा उचलण्याची वेळ महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर आली आहे. स्टॉलधारक मात्र पैसा कमवून गायब झाले.

भारती विद्यापीठामागील चंद्रभागा चौकालगतची महापालिका शाळा आणि दाट लोक वस्तीतीला मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शाळेच्या भव्य क्रीडांगणाला खासगी कार्यक्रमासाठी मागणी वाढत आहे. या क्रीडांगणाचा या-ना त्या खासगी कारणासाठी सातत्याने वापर केला जात आहे. क्रीडांगणाचा सातत्याने होणारा गैरवापर शाळेच्या शैक्षणिक वातावरणासाठी बाधा ठरत आहे. पालकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मुख्याध्यापकांनीही शिक्षण विभागाला तशी पत्रे दिली आहेत; परंतु शैक्षणिक वातावरणाची फिकीर न करणारा महापालिकेचा मालमत्ता व्यवस्थापान विभाग आणि बधीर शिक्षण विभागाने क्रीडांगणाचा धंदाच माडल्याची स्थिती आहे. 

येथे गेल्या चार वर्षांपासून फटाका स्टॉलची झालेली घुसखोरी अस्वच्छतेला खतपाणी घालत आहे. दिवाळी संपताच फटाका स्टॉल काढून घेतल्यानंतर जमा झालेला कचरा एकत्र गोळा करून महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाकडे देण्याची जबाबदारी स्टॉलधारकांची होती; परंतु तब्बल दोन आठवडे तो कचरा तिथेच पडून होता. तो अखेर पालिका कर्मचाऱ्यांना उचलला. 

शाळेच्या क्रीडांगणावर होणारे खासगी कार्यक्रम हे महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या परवानगीने होतात. परवानगी देताना काही अटी व शर्ती घालून दिल्या जातात, त्या पाळल्या जातात का नाही हे पाहिले जात नाही. फटाका स्टॉलचा कचरा स्टॉलधारकांनी किमान गोळा करून घनकचरा  व्यवस्थापनाकडे देण्याची तसदी घेणे आवश्यक होते.
- जयेश शेंडकर, सहायक प्रशासकीय अधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com