

IT Engineer's Radical Intentions Exposed by Pune ATS
Sakal
पुणे : राज्य दहशतवादी विरोधी पथकाच्या (एटीएस) ९ ऑक्टोबर रोजी टाकलेल्या छाप्यात पुण्यातील एका तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंत्याचे धक्कादायक मनसुबे उघडकीस आले आहेत. मागील १५ वर्षांहून अधिक काळ पुण्यातील नामांकित आयटी कंपन्यांत काम करणाऱ्या झुबेर हंगरगीकर या अभियंत्याकडे अल-कायदासह कट्टरवादाचे साहित्य, बॉम्बनिर्मितीचे मार्गदर्शक आणि ‘जिहाद’ प्रशिक्षणाची पुस्तके आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली आहे.