पुणे : एजंटांनी आणखी दोघांना किडनी मिळवून दिल्याचा प्रकार उघडकीस

रूबी हॉल क्लिनिकमधील किडनी प्रत्यारोपण प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या एजंटांनी आणखी दोघांना किडनी मिळवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
kidney
kidneySakal
Summary

रूबी हॉल क्लिनिकमधील किडनी प्रत्यारोपण प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या एजंटांनी आणखी दोघांना किडनी मिळवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे - रूबी हॉल क्लिनिकमधील किडनी प्रत्यारोपण प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या एजंटांनी आणखी दोघांना किडनी मिळवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांनी सहा वर्षांपूर्वी बदलापूर येथील एका डॉक्टरांच्या वडिलांना आणि पंढरपूर येथील एकास किडनी मिळवून दिली आहे.

आरोपींनी मिळवून दिलेल्या किडन्यांचे ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आणि कोइमतूर येथील केएचसीएच हॉस्पिटलमध्ये प्रत्योरापण झाले आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे. अभिजित शशिकांत गटणे (वय ४०, रा. रजूत वीटभट्टी, एरंडवणे गावठाण) आणि रवींद्र महादेव रोडगे (वय ४३, रा. लांडेवाडी, पिंपरी-चिंचवड) अशी या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही एजंट आहेत. त्यांनी देखील त्यांची किडनी दिल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे. पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना बुधवारी (ता. १८) न्यायालयात हजर करण्यात आले होते.

रोडगे याने त्यावेळचा एजंट सावंत याच्या मदतीने त्याची एक किडनी कल्याणीनगर येथे राहणारी मुलगी दिशा कोचर हिला दिली आहे. ती मुलगी त्याच्या घरातील नोकर असल्याचे त्याने दाखवले आहे. तर गटणे याने देखील २०१२ साली सावंत याच्यावितीने त्याची एक किडनी बंगलोर येथे राहणारे रतन पाटील यांना दिली आहे. ते मामा असल्याचे त्याने कागदोपत्री दाखवले आहे.

यांना मिळवून दिल्या किडन्या :

दोन्ही आरोपींनी सुमारे सहा वर्षांपूर्वी बदलापूर येथील डॉ. निमसाखरे यांच्या वडिलांना इस्लामपूर येथील गजेंद्र ठोंबरे यांची किडनी मिळवून दिली आहे. प्रत्यारोपणाची प्रक्रीया ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पार पडली. तर दीड ते दोन वर्षापूर्वी पंढरपूर येथील विठ्ठल बागल यांना पुण्यातील राणी नामाच्या महिलेची किडनी मिळवून दिली. संबंधित महिला ही विठ्ठल बागल यांची पत्नी असल्याचे कागदपत्र त्यावेळी सादर करण्यात आले होते. कोइमतूर केएमसीएच हॉस्पिटलमध्ये हे ऑपरेशन झाले.

आंतरराज्यीय टोळी असल्याची शक्यता :

या गुन्ह्यात आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून यामध्ये आंतरराज्यीय टोळी सक्रिय असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून त्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढू शकते. गुन्ह्याच्या तपासामध्ये ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या मुद्यावर आरोपीकडे तपास करण्यासाठी त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील दिलीप गायकवाड यांनी केली.

तपास गुन्हे शाखेकडे वर्ग :

खोट कागदपत्रे सादर करून भलत्याच व्यक्तींना किडनी दिल्याचे आणखी दोन प्रकरणे या गुन्ह्याच्या तपासातून पुढे आले आहेत. या गुन्ह्याची व्याप्ती वाढतच असून त्यांची सविस्तर चौकशी करण्यासाठी आता हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com