
Pune's Jain Boarding land sale halted by the Charity Commissioner
Sakal
पुणे : मॉडेल कॉलनी येथील शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगची (जैन बोर्डिंग) जागा बिल्डरला विकल्याने पुण्यातील राजकारण तापलेले आहे. त्यातच या व्यवहाराला धर्मादाय आयुक्तांनी स्थगिती दिली आहे. पुढील आदेशापर्यंत हा व्यवहार जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बोर्डिंगच्या आवारात मंदिर आहे की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा अहवाल सादर करा असे आदेश पुण्यातील धर्मदाय सहआयुक्तांना देण्यात आले आहेत.