
अनलॉक प्रक्रिया अंतर्गत आठ महिन्यानंतर पुणे-जम्मूतावी लोहमार्गावर १ डिसेंबर पासून विशेष ट्रेन धावणार आहे. २१७१ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सात राज्ये व एका केंद्रशासित राज्यातून ही ट्रेन धावणार आहे.
दौंड (पुणे) : अनलॉक प्रक्रिया अंतर्गत आठ महिन्यानंतर पुणे-जम्मूतावी लोहमार्गावर १ डिसेंबर पासून विशेष ट्रेन धावणार आहे. २१७१ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सात राज्ये व एका केंद्रशासित राज्यातून ही ट्रेन धावणार आहे.
मुंबई-पुणे 'एक्सप्रेस वे'वर दुधाचा टँकर उलटला; वाहतूक विस्कळीत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च पासून पूर्णपणे ठप्प असलेली देशभरातील रेल्वे सेवा निर्बंध शिथिल झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने पूर्ववत होत आहे. पुणे - जम्मूतावी (झेलम एक्सप्रेस) २२ मार्च पासून बंद आहे. परंतु रेल्वे प्रशासनाने या मार्गावर विषेष ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ डिसेंबर रोजी पुणे - जम्मूतावी दरम्यान विशेष ट्रेन पुणे येथून संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटांनी रवाना होणार आहे. या ट्रेन मध्ये प्रवाशांकरिता १० स्लीपर क्लास, ०५ सेकंड क्लास, ०२ एसी टू टीयर, ०६ एसी थ्री टीयर, असे एकूण २३ डब्बे असणार आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुणे-जम्मूतावी ही ट्रेन महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली , हरियाणा, पंजाब या सात राज्यांसह जम्मू व काश्मीर या केंद्र शासित प्रदेशातून जाणारी ट्रेन आहे. एकूण ५९ थांबे घेत २१७१ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी या ट्रेनला किमान ४० तासांचा कालावधी लागणार आहे.
पुण्यातील येरवडा, विश्रांतवाडी, वडगावशेरी, धानोरी भागात मिळणार पुरेसे पाणी कारण..
सदर ट्रेन दौंड रेल्वे स्थानक येथे येणार नसून त्याऐवजी पुणे-पाटस-सोनवडी-नगर या नूतन लोहमार्गावरील कॅार्ड लाइनवर मार्गक्रमण करणार आहे. सोनवडी (ता. दौंड) स्थानकावर या ट्रेनला दोन मिनिटांचा थांबा देण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत पुणे - जम्मूतावी व जम्मूतावी - पुणे विशेष ट्रेन दररोज धावणार आहे.
(संपादन : सागर डी. शेलार)