esakal | पुण्यात थंडी वाढणार की पाऊस पडणार; महत्वाची अपडेट घ्या जाणून
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात थंडी वाढणार की पाऊस पडणार; महत्वाची अपडेट घ्या जाणून

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात थंडीसाठी सुयोग्य असं स्वच्छ, कोरडं हवामान नसेल. त्याऐवजी मळभ असेल आणि तुरळक ठिकाणी पाऊसही होऊ शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुण्यात थंडी वाढणार की पाऊस पडणार; महत्वाची अपडेट घ्या जाणून

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : सध्या देशात चक्रीवादळांची मालिकाच सुरु आहे. या चक्रीवादळांचा मोठा परिणाम थंडीच्या मोसमावर होत आहे.
ही चक्रीवादळांची मालिका या आठवड्यातही कायम राहणार आहे. गेल्याच आठवड्यात दक्षिण भारताला चक्रीवादळाचा  जोरदार तडाखा बसला आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवला. ऐन थंडीच्या मोसमात आपल्याकडे ढगाळ हवामान झाले आहे. त्याच्याच परिणामामुळे पुण्याचे हवामान देखील गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ झाले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. पुढच्या 24 तासांत याचं रुपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ पूर्व किनारपट्टीवर कमी तीव्रतेचं चक्रीवादळच घोंघावणार आहे. याचा परिणाम म्हणून पुढचे चार दिवस तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि केरळ, आंध्र प्रदेशच्या किनारी भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचाच परिणाम महाराष्ट्रावर देखील होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे राज्यात पाऊस पडू शकतो, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

बारामतीतील वडगावच्या पोलिसांवर फलटणमध्ये आरोपींकडून गोळीबार

अंदमानच्या समुद्रात निर्माण होत असलेल्या या कमी दाबाच्या पट्ट्याचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नसला, तरी या दक्षिण भारतातल्या चक्रीवादळामुळे राज्यात अपेक्षित असलेली थंडी आणखी लांबली आहे. नोव्हेंबर महिन्यात मोजून दोन-तीन दिवस चुणूक दाखवून या वर्षी थंडी गायब झाली आहे.

आईच निघाली सव्वा महिन्याच्या मुलीची मारेकरी

थंडी गायब का?- पुढचे काही दिवस तरी महाऱाष्ट्रात सध्याच्या वातावरणात फारसा फरक होणार नसल्याचं वेधशाळेने सांगितलं आहे. म्हणजे थंडीसाठी अजूनही प्रतिक्षाच करावी लागणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात थंडीसाठी सुयोग्य असं स्वच्छ, कोरडं हवामान नसेल. त्याऐवजी मळभ असेल आणि तुरळक ठिकाणी पाऊसही होऊ शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

loading image