कमला नेहरु हॉस्पिटलमधील डॉक्टर आंदोलनाच्या पावित्र्यात...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

पुणे महानगर पालिकेचे मंगळवार पेठेत असलेल्या कमला नेहरू रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी दोन वेगवेगळ्या मागण्यांसाठी महापालिकेला निवेदन दिले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास डॉक्टर आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

पुणे : पुणे महानगर पालिकेचे मंगळवार पेठेत असलेल्या कमला नेहरू रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी दोन वेगवेगळ्या मागण्यांसाठी महापालिकेला निवेदन दिले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास डॉक्टर आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

कमला नेहरु रुग्णालयातील 20 निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी प्रशासनास वेतन वाढीसदंर्भात डिसेंबर महिन्यात मागणी केली होती. पण, अद्याप मागणी मंजूर झालेली नाही. रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकाऱयांना सध्या 26,800 रुपये एवढे मासीक वेतन मिळत आहे. दुसरीकडे नव्याने भरती होणाऱया डॉक्टरांना 60,000 एवढे वेतन दिले जाणार आहे. पण, अनुभवी डॉक्टरांना तुलनेत निम्मात पगार मिळत आहे. महाराष्ट्र शासनाच्या रुग्णालयात याच पदावरील डॉक्टरांना 55,000 वेतन दिले जाते. शासनाने जीआर काढून प्रशासनाकडे सुपूर्द केला आहे. पण, वेळकाढू पणामुळे निर्णय देण्यात आलेला नाही. शिवाय, रुग्णालयामध्ये काम करत असताना काही रुग्णांचे नातेवाईक मद्यपान करून गैरवर्तणूक करून अडथळा निर्माण करतात. शिवाय, डॉक्टरांना आरेरावीची भाषा वापरून धमकावतात.

कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे डॉक्टरांना अहोरात्र काम करावे लागत आहे. पण, कमी वेतनामुळे गरजा पुर्ण होत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे डॉक्टरांच्या वेतनवाढीसंदर्भात बोलले आहेत. पण, रुग्णालयात चोवीस तास काम करून निम्मेच वेतन मिळत आहे. या संदर्भात लेखी पत्र प्रशानसनाला देण्यात आले आहे. दोन्ही मागण्यांची त्वरीत अंमलबजावणी करण्याची मागणी सर्व निवासी वैद्यकीय अधिकाऱयांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास वैद्यकीय अधिकारी आंदोलनाच्या तयारीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune kamala nehru hospital doctor payment issue