Pune News: रुग्णांना नेण्यासाठीचे स्ट्रेचर बनले राडारोडा वाहतुकीचे साधन; पुणे महापालिकेच्या रुग्णालयातील प्रकार

Patient Stretcher Used to Carry Debris at Pune Municipal Hospital: पुणे महापालिकेच्या रुग्णालयात स्ट्रेचरचा गैरवापर; ठेकेदाराला नोटीस, कारवाईचा इशारा
Pune Municipal Hospital Stretcher Misused for Construction Waste Transport Contractor Faces Notice Over Hospital Renovation

Pune Municipal Hospital Stretcher Misused for Construction Waste Transport Contractor Faces Notice Over Hospital Renovation

esakal

Updated on: 

पुणे: रुग्णांना तातडीने उपचारासाठी ने-आण करण्यासाठी असलेल्या स्ट्रेचरचा वापर चक्क बांधकामाचा राडारोडा वाहून नेण्यासाठी केला जात असल्याचा संतापजनक प्रकार पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात समोर आला आहे.

मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून इमारतीच्या पाचही मजल्यांच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी भवन विभागाकडून १२ कोटी रुपये खर्च करून खिडक्या बदलणे, वॉर्ड आणि बाहेरच्या व्हरंड्यातील फरशा बदलणे, इमारतीमधील गळती रोखणे, रंगकाम यासह अन्य कामे केली जाणार आहेत. हे काम तेजस कन्स्ट्रक्शन नावाच्या ठेकेदाराला देण्यात आले आहे.

Loading content, please wait...