

pune accident news
esakal
पुणेः दुचाकीवरून दोघे मित्र जात असताना अचानक गळ्याला मोठी दोर अडकून त्यांचा अपघात होतो. यात दुचाकीस्वाराला मोठी दुखापत होऊन त्याचा गळा चिरल्याने तो तो रक्ताच्या थारोळ्यात तो पडतो. नेमके काय झाले हेच कळत नाही आणि एकच खळबळ उडते. स्थानिक नागरिकांकडून त्वरित दोघांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखले केले. हा प्रकार घडला आहे कर्वेनगर येथील मेघराज सोसायटीच्या समोर. सोसायटीकडून व त्यांच्या ठेकेदाराने झाडाच्या फांद्या तोडताना नियमांचे पालन न केल्याने हा निष्काळजीपणा तरुणाच्या जिवावर उठला आहे.