कसब्यात काँग्रेसला मोठा दिलासा; बाळासाहेबांनी अर्ज घेतला मागे: Kasaba Bypoll Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kasaba Bypoll Election

Kasaba Bypoll Election : कसब्यात काँग्रेसला मोठा दिलासा; बाळासाहेबांनी अर्ज घेतला मागे

काँग्रेसमध्ये बंडखोरी करत बाळासाहेब दाभेकर यांनी मंगळवारी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांना आता हा अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. दाभेकर यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.

बाळासाहेब दाभेकर यांचा अर्ज माघारी घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे आमदार संग्राम थोपटे व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी दाभेकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला होता.

दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी दाभेकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. नारायण पेठेतील मोदी गणपती मंदिरपासून अप्पा बळवंत चौक मार्गे दुचाकी फेरी काढण्यात आली होती.

टॅग्स :Congress