Kasba Peth Bypoll Election : उमेदवारीपूर्वीच माजी नगरसेवकाची मोठी मागणी pune kasaba bypoll elections along with the congress ncp and shivsenas Thackrey group also interested | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kasba Peth Bypoll Election : उमेदवारीपूर्वीच माजी नगरसेवकाची मोठी मागणी

Kasba Peth Bypoll Election : उमेदवारीपूर्वीच माजी नगरसेवकाची मोठी मागणी

राज्यातील रिक्त झालेल्या विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे पुण्याच्या माजी महापौर आणि भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोट निवडणूक होणार आहे. दरम्यान कसबा पेठ पोटनिवडणूक महाविकास आघाडीतीन तिन्ही पक्ष लढणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ आता उद्धव ठाकरे यांच्या गटानेही कसब्यातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. कसब्याची जागा उद्धव ठाकरे गटाला देण्याची मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी केली आहे. स्वतः विशाल धनवडे कसब्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील यांचीही निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे.

हे ही वाचा : ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

तर या निवडणुकीसाठी भाजपसह महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष तयारी दाखवत आहेत. कसबा विधानसभेची जागा महाविकास आघाडीने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला द्यावी अशी मागणी आज शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांची केली आहे. दोन दिवसात सचिन आहिर आणि संजय राऊत यांच्यासोबत बैठक घेणार असून शिंदे गटाविरोधात असलेल्या रागाचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो याचा विचार करावा असंही विशाल धनवडे यांनी म्हंटलं आहे. २०१९ ला विशाल धनवडे यांनी युती असल्याने अपक्ष निवडणूक लढवली होती. तर आताही पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

मुक्ता टिळक यांच्यानिधनानंतर काल निवडणूक आयोगाने ही पोटनिवडणूक जाहीर केली. मात्र ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे

हेही वाचा: Devendra Fadanvis : "मविआने मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट दिलं होतं"