Pune : कात्रज लेक टाऊन जवळील पुलाचे काम निकृष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Katraj Bridge damage

Pune : कात्रज लेक टाऊन जवळील पुलाचे काम निकृष्ट

कात्रज : लेकटाऊन सोसायटीजवळ सुरु असलेल्या कल्व्हर्टचे काम सुरुवातीच्या काळात अत्यंत संथगतीने करण्यात आले. त्यानंतर काम पुर्ण झाल्याचे सांगण्यात येत असले तरी हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.

रस्त्यावरील असमोतोलपणामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून खड्डे आहेत. तसेच, डांबरीकरण अर्धवट करण्यात आले आहे. रस्त्यांपर खडीही पडली आहे. २५ सप्टेंबर २०१९मध्ये झालेल्या मुसळधार पावसाने आंबील ओढ्याला आलेल्या पुरामुळे लेकटाऊन पूल वाहून गेला.

त्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर या पुलाचे काम हाती घेण्यात आले होते. ते पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत असले तरी नागरिकांच्या पाठीमागील समस्यांचा ससेमिरा काही सुटलेला नाही. त्यामुळे प्रशासनाने या अडचणींवर मार्ग काढण्याची मागणी नागरिक करत आहेत.

मुळात हे काम ठेकेदाराने अर्धवट केले आहे. डांबरीकरण अर्धवट असून पदपथाजवळ असलेल्या खड्ड्यात लहान मूल किंवा ज्येष्ठ नागरिक नाल्यात पडण्याची भीती आहे. डांबरीकरण अर्धवट असल्याने रस्त्याची आणखीनच दुरवस्था झाली आहे. - अश्विनी लबडे, सामान्य नागरिक

मागील काही काळ सातत्याने पाऊस सुरु असल्याने डांबर प्लांट बंद होता. आता पाऊस उघडला असून सर्वकाही सुरळित होत आहे. या पार्श्वभूमीवर पुलावरील रस्त्याचे खड्डे बुजिवण्यात येतील. तसेच, पाहणी करुन पुलाची दुरुस्ती करुन घेण्यात येईल.

- अमोल कडू, कनिष्ठ अभियंता, पथ विभाग