Civic Neglect Amidst Pune Election Preparations
Sakal
पुणे
Pune News : कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात निवडणूक तयारीत नागरी समस्यांकडे दुर्लक्ष; नागरिकांमध्ये नाराजी
Civic Neglect Amidst Pune Election Preparations : महापालिका निवडणुकीच्या तयारीमुळे धनकवडी-सहकारनगर आणि कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयांच्या दुर्लक्षामुळे कात्रज परिसरात पथदिव्यांचा अभाव, रस्त्यांवरील खड्डे, गटारींचा वास आणि अपुरा पाणीपुरवठा यांसारख्या नागरी समस्यांची तीव्रता वाढली आहे.
कात्रज : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र मतदार नोंदणी, नाव तपासणी आणि यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. परंतु धनकवडी-सहकारनगर आणि कोंढवा-येवलेवाडी या क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांचे सगळे लक्ष फक्त निवडणूक तयारीवर केंद्रित असल्याने, परिसरातील दैनंदिन नागरी समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. परिणामी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

