

Safety Concerns for 150-Year-Old Katraj Tunnel
Sakal
कात्रज : जुन्या कात्रज घाटातील बोगद्याच्या सुरक्षिततेलाच प्रशासनाकडून ‘कात्रजचा घाट’ दाखविण्यात येत आहे. हा बोगदा ब्रिटिशकालीन असून त्यास जवळपास दीडशे वर्षे पूर्ण झाल्याचा अंदाज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेल्या आर्थिक वर्षात बोगद्याच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे प्रस्ताव देत निधीची मागणी केली होती. मात्र या प्रस्तावाला शासनाने केराची टोपली दाखवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.