पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यांवर अपघात; एकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune road accidnet

पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यांवर अपघात; एकाचा मृत्यू

कात्रज : कोंढवा रस्त्यांवर मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. कोंढवा वाहतूक विभागाच्या हद्दीत टिळेकरनगर स्मशानभूमीशेजारील नाल्यालगत हा अपघात झाला. खडीमशीन चौकाकडून शत्रूंजय मंदिर चौकाकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकचा (एमएच०४ पी६४८७) शत्रूंजय मंदिर चौकाकडेच जाणाऱ्या दुचाकीला (एमएच१२ टीजी२९३४) धक्का लागला. त्यानंतर दुचाकीचालक मालवाहू गाडीच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

करण हरिदास बरखडे असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात ट्रकचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान काहीकाळ अपघातामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. कोंडवा वाहतूक पोलिसांनी ही कोंडी सोडवत रस्ता रिकामा केला. दरम्यान, मागील तीन वर्षापासून रखडलेल्या रस्त्यांच्या कामाचा आणखी एक बळी गेल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Web Title: Pune Katraj Kondhwa Road Accident Death Badroad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top