

Speeding Truck Hits Teacher in Pune
sakal
पुणे, ता. १५ : भरधाव ट्रकने पाठीमागुन दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षिकेचा मृत्यू झाला. ही घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. रमा ललितप्रसाद कापडी (वय ५२, रा. श्रीनिवास संकुल, माऊलीनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या शिक्षिकेचे नाव आहे.