

Technical Flaws in Heavy Vehicle Brakes
Sakal
दिनेश दाणी, वाहनविषयक तांत्रिक सल्लागार
पुणे शहराबाहेरून जाणाऱ्या बाह्यवळणावर एक तीव्र उतार आहे. त्याची लांबी कात्रजच्या बोगद्यापासून नवले पुलापर्यंत साधारण १० किलोमीटर आहे. हा रस्ता दोन्ही मार्गिकांमध्ये उत्तम प्रकारे बांधला असून, त्यात रस्ता म्हणून काहीही दोष नाही. मात्र, या पट्ट्यात गेल्या काही वर्षांत अनेक अपघात जड वाहनांमुळे आणि उतार उतरताना ब्रेक निकामी होऊन झाले आहेत.