esakal | पुण्यात कात्रजमधील भारती विद्यापीठ परिसरात नवीन लसीकरण केंद्र
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccine

या केंद्रावर दररोज साधारणतः  १५० ते २०० नागरिकांचे लसीकरण करण्याचा मानस आहे.

पुण्यात कात्रजमधील भारती विद्यापीठ परिसरात नवीन लसीकरण केंद्र

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कात्रज : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कात्रज परिसरातील भारती विद्यापीठ परिसरातील कै. अभिजित पतंगराव कदम बहुद्देशीय संकुल येथे नवीन लसीकरण केंद्राची सुरवात करण्यात आली आहे. या केंद्रावर दररोज साधारणतः  १५० ते २०० नागरिकांचे लसीकरण करण्याचा मानस आहे. आंबेगाव पठार, भारती विद्यापीठ, मोरेबाग परिसरातील नागरिकांसाठी हे कोविड-19 लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून स्थानिक नगरसेवक युवराज बेलदरे यांनी महापालिकेकडे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. बहुतांश जेष्ठ नागरिकांना धनकवडीत किंवा दत्तनगरमधील लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्यासाठी याचा त्रास होत असे, याबसोबतच कात्रज, आंबेगाव परिसरातील लसीकरण मोहिमेस नागरिकांचा प्रतिसाद पाहता अजून एका मोठ्या केंद्राची आवश्यकता लक्षात घेऊन हे लसीकरण केंद्र उभारले असल्याची प्रतिक्रिया बेलदरे यांनी दिली. पहिल्या दिवशी केंद्रावर सिरमच्या कोविशिल्ड लशीचे १०० डोस आले होते. त्यानंतर संजय रघुनाथ यादव या पहिल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. 

- राज्यभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पहिल्या दिवशी केंद्रावर गोंधळ
पहिल्या दिवशी ऑनलाईन प्रक्रिया करताना वेळ लागल्याने केंद्रावर गोंधळ उडाल्याचे चित्र होते. काही ऑनलाईन त्रुटी असल्याने नागरिकांना दोन ते अडीच तास लसीकरण केंद्राबाहेर ताटकळत बसावे लागले. साधारणतः साडेबाराच्या सुमारास पहिल्या नागरिकाला प्रत्यक्ष लस देण्यात आली.

- जगभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नवीन लसीकरण केंद्र सुरु होताना सगळ्या गोष्टी पहिल्यापासून कराव्या लागतात. त्यामुळे साइटवर लोड येतो. प्रत्येक ठिकाणी असा प्रकार घडत असतो. परंतु, थोड्या वेळाने ही अडचण दुरुस्त होऊन लसीकरणास सुरुवात होत असल्याची माहिती धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाच्या सहायक आयुक्त प्रज्ञा पोतदार यांनी दिली यावेळी आरोग्य अधिकारी विद्या नागमोडे उपस्थित होत्या.

loading image