Pune Crime : पुण्यात १७ वर्षांच्या मुलाची हत्या, पोलिसांनी भर पावसात काढली गुन्हेगारांची धिंड; मृताच्या आईने आरोपींना सर्वांसमोर चपलेने मारले

Katraj Teen Murder : घटनेनंतर संतप्त कुटुंबीयांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने केली. पोलिसांनी चार आरोपींना अटक करून त्यांची शहरातून धिंड काढली. सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल असून तीन आरोपी अद्याप फरार आहेत.
Pune Crime

Pune Crime

esakal

Updated on

पुण्यातील कात्रज परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.लोखंडी सळयांनी हल्ला करून सात जणांच्या टोळक्याने १७ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या घटनेमुळे संतप्त झालेल्या पीडित कुटुंबाने पोलीस ठाण्याबाहेर जोरदार निदर्शने केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि आरोपींच्या मनात कायद्याची भीती निर्माण करण्यासाठी, पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींना पोलीस व्हॅनच्या बोनेटवर बांधले आणि मुसळधार पावसात त्यांची शहरातून धिंड काढली.यावेळी मृताच्या आईने आरोपींना भर रस्त्यात पोलिसांसमोरच चपलेनं मारत संताप व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com