esakal | केदार जाधवची अकॅडमी शोधणार पुण्यातील 'क्रिकेट टॅलेंट'! 
sakal

बोलून बातमी शोधा

केदार जाधवची अकॅडमी शोधणार पुण्यातील 'क्रिकेट टॅलेंट'! 

रोहित शर्मा आणि धोनीनंतर आता केदार जाधव यानेही क्रिकेट अकॅडमी सुरु केली आहे.

केदार जाधवची अकॅडमी शोधणार पुण्यातील 'क्रिकेट टॅलेंट'! 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

भारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव यानं पुण्यातील कोथरुड येथे आपल्या क्रिकेट अकॅडमीचं उद्‌घाटन केलं आहे. नव्या दमाच्या खेळाडूंना शास्त्रोक्त प्रशिक्षण देतानाच त्यांना अधिकाधिक सरावातून स्पर्धात्मक क्रिकेटसाठी तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे यावेळी केदार जाधव यानं सांगितलं. सोमवारी केदार जाधव यानं कोथरुडमध्ये अकॅडमी अकॅडमीचं उद्‌घाटन केलं. केदार जाधव यानं उद्‌घाटनातील काही क्षणचित्रे आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहेत. 

केदार जाधव याच्या क्रिकेट अकॅडमीच्या उद्‌घाटनाला, केदार जाधव याचे कुटुंबिय, पत्रकार सुनंदन लेले, दिवाकर निमकर, धनंजय बर्वे आणि महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक संतोष जेधे आणि खेळाडू उपस्थित होते.  केदार जाधव याच्या क्रिकेट अकॅडमीमध्ये दोन इंडोर खेळपट्या, गोलंदाजी मशीन, थ्रोडाऊन स्पेशालिस्ट आणि दिवसरात्र सामन्यासाठी प्रशिक्षण दिलं जाईल. भारतीय क्रिकेटपटू उमेश यादव आणि सुरेश रैना यांनी केदार जाधव याला नव्या इनिंगसाठी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहे. 

३५ वर्षीय केदार जाधव सध्या खराब फॉर्ममुळे भारतीय संघाबाहेर आहे. तर यंदाच्या आयपीएलमध्ये केदार जाधव सनरायजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार आहे. चेन्नई संघानं आयपीएल लिलावापूर्वी केदारला करारमुक्त केलं होतं. केदार जाधव यानं २०१४ ते २० यादरम्यान ७३ एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये दोन शतकांसह त्यानं १३८९ धावा काढल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात केदारनं २७ बळीही घेतले आहेत. केदारनं २०१५ ते २०१७ यादरम्यान ९ टी-२० सामन्यात त्यानं भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.