

Khadakwasla Bridge
Sakal
खडकवासला : खडकवासला धरणालगतच्या मुठा नदीवरील जुना पूल जीर्ण झाला असून, सुरक्षेच्या कारणास्तव महापालिकेने या पुलावर अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घातली आहे. यासाठी येथे उंची प्रतिबंधित लोखंडी चौकट (हाइट बॅरिअर) बसवली आहे, मात्र तरीही अवजड वाहनांची वाहतूक सुरूच असल्याने येथे अपघाताचा धोका वाढला आहे.