

Khadakwasla Encroachment Drive Continues
Sakal
खडकवासला : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमणांवर दुसऱ्या दिवशीही कारवाई करण्यात आली. धरणाच्या उजव्या बाजूस (पानशेत रस्ता) असलेल्या तीन हॉटेल्स, खडकवासला येथील एक प्रार्थनास्थळ आणि चौपाटी परिसरातील पाच कठडे तोडण्यात आले. तसेच, वेल्हे तालुक्यातील निगडे ओसाडे गावाच्या हद्दीतही कारवाई केली.