esakal | Pune : पावसाचा जोर ओसरल्याने खडकवासल्यातून विसर्ग कमी
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : पावसाचा जोर ओसरल्याने खडकवासल्यातून विसर्ग कमी

Pune : पावसाचा जोर ओसरल्याने खडकवासल्यातून विसर्ग कमी

sakal_logo
By
राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : पुणे जिल्हात सोमवारी व मंगळवारी जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. आज मंगळवारी सोमवार पेक्षा ही पाऊस कमी झाला. परिणामी खडकवासला धरणातून मंगळवारी सकाळी ११ हजार ४९१ क्यूसेक होता. धरणाचे ११ दरवाजे प्रत्येकी एक फुटाने उघडले होते. पावसाचा जोर कमी झाल्याने संध्याकाळी पाच वाजता विसर्ग ७ हजार ७०४ क्युसेक पर्यंत कमी केला आहे.

खडकवासला धरण साखळीतील चारी धरण शंभर टक्के भरले आहेत. या चार ही धरणातून विसर्ग सुरू आहे. वरसगाव धरणातून देखील वीजनिर्मितीसाठी सहाशे क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे. सांडव्यातून एक हजार ७७७ क्यूसेस अशा प्रकारे दोन हजार ३७७ क्यूसेकचा विसर्ग मोसे नदीत सुरू आहे. पानशेत धरणातून वीजनिर्मितीसाठी सहाशे आणि सांडव्यातून एक हजार ७९० असा एकूण दोन हजार ३९० क्युसेक विसर्ग आंबी नदीत सुरू आहे.

टेमघर धरण ओव्हरफ्लो होत आहे त्यातून, ७४५ क्युसेक विसर्ग मुठा नदीत सुरू आहे. पानशेत, वरसगाव व टेमघर या तिन्ही धरणातून मिळून पाच हजार ५१२ क्युसेक्स विसर्ग खडकवासला धरणामध्ये जमा होत आहे.

खडकवासला धरणातून सोमवारी रात्री दहा वाजल्यापासून ११ हजार ४९१ क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजता नऊ हजार ४१६ विसर्ग सुरू होता. तो दुपारी चार वाजता सात हजार ७०४ क्युसेक्स करण्यात आला आहे. चार धरणातील पावसाचा जोर वाढेल तसा धरणातील विसर्ग वाढणार आहे. दरम्यान, आज मंगळवारी दिवसभरात खडकवासला एक, पानशेत येथे ११ मिलिमीटर वरसगाव येथे ११ मिलिमीटर टेमघर येथे१२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

loading image
go to top