esakal | Pune : खडकवासला धरण पाच वेळा भरेल, एवढे पाणी सोडले
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : खडकवासला धरण पाच वेळा भरेल, एवढे पाणी सोडले

Pune : खडकवासला धरण पाच वेळा भरेल, एवढे पाणी सोडले

sakal_logo
By
राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : खडकवासला धरणाची साठवण क्षमता १.९८ टीएमसी आहे. यंदा या धरणातून आज अखेर १० टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. धरणातून सोडलेले पाणी खडकवासला धरण पाच वेळा भरेल एवढं आहे.

खडकवासला धरण १५ जुलै रोजी पूर्ण भरण्याच्या मार्गावर असताना कालव्यातून शेतीला पाणी सोडले. कालवा सलग ६० दिवस सुरु होता. तो मंगळवारी म्हणजे ७ सप्टेंबर रोजी बंद केला आहे. या दरम्यान कालव्यातून सुमारे पाच टीएमसी पाणी दौंड, इंदापूर व हवेली तालुक्यातील शेतीला दिले.

दरम्यान, कालव्यातून पाणी सोडले पण पावसाचा जोर वाढला होता. खडकवासला धरण २२ जुलै रोजी १०० टक्के भरल्याने धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात आले. जुलै महिन्यात या १७ ते २३ जुलै या दिवशी कोकण व कोल्हापूरला जास्त पावसाचा मोठा फटका बसला होता. खडकवासला धरण साखळीत पावसाचा जोर कमी जास्त झाला तसा धरणातील पाणी सोडण्याचा विसर्ग कमी जास्त केला होता. अशा प्रकारे साडेचार टीएमसी पाणी मुठा नदीत सोडले. हे पाणी मुठा नदीतून उजनीला जाऊन मिळते.

जुलै, ऑगस्ट आज अखेर दरम्यान सुमारे सव्वा टीएमसी पाणी शहर परिसराला पिण्यासाठी घेतले. कालव्यातील पाच टीएमसी, नदीत साडेचार टीएमसी, पिण्यासाठी सव्वा टीएमसी असे मिळून दहा टीएमसी पाणी खडकवासला धरणातून सोडले आहे.

दरम्यान, दोन दिवसांपासून खडकवासला धरणातून पावसाळ्यातील दुसरे आवर्तन सोडण्यास सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात धरणात जमा होणारे पाणी जास्तीतजास्त साठवणे हा मुख्य भूमिका आहे. त्याचबरोबर पावसाळ्यात कालव्यातून हवेली, दौंड, इंदापूर तालुक्यातील शेती व पिण्यासाठी तलाव भरले जातात. अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी सांगितले.

loading image
go to top