
Pune Khadki Cantonment : पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंटचे पुणे महापालिकेत विलीनीकरण करण्यासाठी तांत्रिक मुद्द्यांवर संरक्षण विभागासोबत चर्चा करण्यात आली आहे. विलिनीकरणासंदर्भातील मार्गदर्शक सूचना त्यांच्याकडून महापालिकेला दिल्या जाणार आहेत. त्यानुसार प्रस्ताव करून राज्य शासनाकडे पाठवला जाईल. केंद्र व राज्य शासन अंतिम निर्णय घेणार आहे, असे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.