Police Register Non-Cognizable Complaint : विरुद्धदिशेने गाडी का चालवतोय विचारण्यावरून झालेल्या वादातून २९ वर्षीय तरुणाला चार ते पाच जणांनी जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील खडकी येथे ही घटना घडली. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झालं आहे. विशेष म्हणजे तरुणाला इतकी जबर मारहाण झाली असतानाही पुणे पोलिसांनी मात्र अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.