

Kharadi Flat Owners Protest
Sakal
पुणे : घरासाठी सोने विकून व कर्ज काढून सदनिका बुक केली. जून २०२४ मध्ये ताबा मिळेल, असे बांधकाम व्यावसायिकाने सांगितले. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून संथगतीने काम सुरू आहे. आंदोलन केले म्हणून विकसक प्रकल्पावर जाऊ देत नाही. पोलिस आणि महारेराकडे तक्रार दाखल केली. त्यावर अद्याप ठोस निर्णय नाही. त्यामुळे आजही भाडेतत्त्वावरील घरात राहत असून, ताबा न मिळालेल्या सदनिकेचे हप्ते भरत आहोत, अशी व्यथा आहे खराडीतील ‘व्हर्टिलास सहकारी गृहरचना संस्था मर्यादित संस्थेत’ सदनिका बुक केलेल्या १३० सदनिकाधारकांची.