
राजगुरुनगर/चाकण/पाईट : खेड तालुक्यातील पाईटजवळील कुंडेश्वराच्या दर्शनाला जात असताना झालेल्या अपघातातील १० मृतांवर पापळवाडी या त्यांच्या गावी सोमवारी मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातातील जखमींची संख्या ३० असल्याचे खेड तहसीलदार कार्यालयातर्फे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. तसेच, जखमींवर मोफत उपचार करण्याच्या सूचना जखमी दाखल असलेल्या खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत.