
Pune News : पाणीपुरी विक्रेत्यावर चाकूने वार
पुणे- पाणीपुरीचे पैसे मागितल्यावरून विक्रेत्याला दोघांनी मारहाण करून त्याच्यावर चाकूने वार केले. त्यात पाणीपुरी विक्रेता गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी रात्री शनिवारवाड्याजवळ पाणीपुरी स्टॉलवर घडली.
याप्रकरणी राजेंद्रसिंग दयाराम जाठम (वय २२, रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून फरासखाना पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाठम यांचा शिवाजी रस्त्यावरील शनिवारवाड्यासमोर पाणीपुरीचा स्टॉल आहे. शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास रिक्षातून दोघेजण आले.
त्यांनी फिर्यादीला धमकी देत ‘पाणीपुरी खिला, तू अपने भाई को बुला ले’ असे सांगितले. जाठम यांनी त्यांना पाणीपुरी दिली. त्यानंतर पाणीपुरीचे पैसे मागितले असता दोघांनी विक्रेत्याला मारहाण केली. तसेच, चाकूने वार करुन गंभीर जखमी केले.