कोरेगाव पुणे-कोल्हापूर-पुणे रेल्वे दररोज धावणार

कोरेगाव पुणे-कोल्हापूर-पुणे रेल्वे दररोज धावणार
Published on: 

पुणे- कोल्हापूर- पुणे रेल्वे दररोज

‘दैनिक एक्स्प्रेस’ असे नामकरण; व्यापारी, नोकरदारांची होणार सोय

कोरेगाव, ता. १६ : मध्य रेल्वेने पुणे- कोल्हापूर- पुणे विशेष गाडीला नियमित ‘दैनिक एक्स्प्रेस’ म्हणून चालवण्यास मंजुरी दिली आहे. विशेष गाडी क्रमांक ०१०२३/ ०१०२४ आता नियमित गाडी क्रमांक ११४१९/११४२० पुणे- कोल्हापूर एक्स्प्रेस म्हणून दररोज चालवण्यात येईल.

पुणे- कोल्हापूर- पुणे दैनिक एक्स्प्रेस गाडी क्रमांक ११४१९ ही २० ऑगस्टपासून दररोज पुणे येथून रात्री ९.४० वाजता सुटेल आणि कोल्हापूर येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ०५.०८ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ११४२० ही २० ऑगस्टपासून दररोज कोल्हापूर येथून रात्री ९.५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५.१० वाजता पोहोचेल.
या गाडीत एक टू टियर वातानुकूलित, चार थ्री टियर वातानुकूलित, सात शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी, एक द्वितीय आसनासह गार्डस् ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार असेल. या गाड्यांच्या वेळा आणि थांब्यांच्या तपशिलासाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीइएस ॲप डाउनलोड करा. प्रवासी तिकीट आरक्षणासाठी रेलवन ॲप देखील डाउनलोड करू शकतात. प्रवाशांनी गाडीच्या क्रमांकांमधील बदलाची कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वेच्या मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रसिद्धीपत्रक डॉ. स्वप्नील नीला यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
..................................
चौकट...
...असे असतील थांबे
या विशेष गाडीला सासवड रोड, जेजुरी, नीरा, लोणंद, वाठार, सातारा, कोरेगाव, रहिमतपूर, तारगाव, मसूर, कऱ्हाड, ताकारी, किर्लोस्करवाडी, भिलवडी, सांगली, मिरज, जयसिंगपूर, हातकणंगले, रुकडी आणि विळवडे हे थांबे राहतील.
.................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Diwali Special Train 2026
Nanded Panvel Express
Nandigram Express
Pune Kolhapur Daily Train Gets Regular Status from October 20
Marathi News Esakal
www.esakal.com