Pune Kolhapur Train : पुणे-कोल्हापूर रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! विशेष दर्जा हटल्याने तिकीट दर घटणार; 'या' तारखेपासून धावणार नव्या क्रमांकाने

Pune Kolhapur train regular status from October 20 : पुणे-कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या रेल्वेला नियमित दर्जा मिळणार असून २० ऑक्टोबरपासून गाडी नव्या क्रमांकासह दररोज धावणार आहे.
Pune Kolhapur Daily Train Gets Regular Status from October 20

Pune Kolhapur Daily Train Gets Regular Status from October 20

esakal

Updated on

पुणे : पुणे-कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या रेल्वेचा विशेष दर्जा काढला जाणार असून ही रेल्वे आता नियमित होणार आहे. विशेष दर्जा असल्याने या रेल्वेचे तिकीट एक्स्प्रेसच्या तुलनेत जास्त होते. आता तिकीट दरात बदल होऊन ते मेल-एक्स्प्रेस एवढे होणार (Pune to Kolhapur train reduced ticket fare) आहे. तिकीट तुलनेने कमी झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने २० ऑक्टोबरपासून ही गाडी नव्या क्रमांकासह दररोज धावण्याला मंजुरी दिली आहे. यामुळे सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या प्रवाशांची सोय होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com