
rape case
esakal
पुण्यातील कोंढवा परिसरातील काकडेवस्ती येथे एक धक्कादायक आणि नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका नराधम पित्याने स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर गेल्या चार महिन्यांपासून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण परिसर हादरला असून, स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत या नराधमाला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले आहे.